आई- सुरुवातीचं विश्व आणि विश्वासाची सुरुवात
‘जगावर आणि स्वत:वर असणारा विश्वास’ ही माणूस म्हणून घडण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट. अगदी तान्ह्या बाळालाही गरजेची असणारी. ‘जगावर आणि स्वत:वर असणारा विश्वास आकाराला येण्यासाठी बाळाशी त्याच्या आईचं किंवा आईसारख्या कुणाचं तरी नातं फार महत्त्वाचं असतं. ‘प्रेम-विश्वास ‘ ह्या संकल्पनेची सुरुवात ह्याच नात्याने होते. बाळाच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्याबरोबरच बाळाला comfort देणं, त्याच्या रडण्याला response देणं, …