Showing 29 Result(s)

विचार बदला…जग बदलेल

‘माझ्याशी सगळ्यांनी चांगलंच वागायला हवं,’ ज्यावेळी हा विचार मनात येतो, त्यावेळी आपल्याशी वाईट  वागणाऱ्या लोकांचा राग येऊ लागतो. वाटतं, “मी तर चांगली आहे, त्यांना काहीच नाही केलं तरीही माझ्याशी असं का वागतात?” आपल्याशी भांडणाऱ्या लोकांचा राग आपल्या डोक्यात बसतो. ह्याला कुठेतरी, “मी खूप चांगली आहे,” ह्या विचाराचाही आधार असावा. आपल्या मनातला आपल्या चांगुलपणाबद्दलचा   दृढ विश्वास  …

आई- सुरुवातीचं विश्व आणि विश्वासाची सुरुवात

‘जगावर आणि स्वत:वर असणारा विश्वास’ ही माणूस म्हणून घडण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट. अगदी तान्ह्या बाळालाही गरजेची असणारी. ‘जगावर आणि स्वत:वर असणारा विश्वास आकाराला येण्यासाठी  बाळाशी त्याच्या आईचं किंवा आईसारख्या कुणाचं तरी नातं फार महत्त्वाचं असतं. ‘प्रेम-विश्वास ‘ ह्या संकल्पनेची सुरुवात ह्याच नात्याने होते. बाळाच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्याबरोबरच बाळाला comfort देणं, त्याच्या रडण्याला response देणं, …

खेळता खेळता वाढे..

माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याचशा आई-बाबांना असं वाटतं, कि, मुलांनी शहाण्यासारखं वागावं. एका जागेवर स्वस्थ बसावं, उड्या मारू नयेत, पळापळी करू नये, शाळेतून निघाल्यानंतर रस्त्याच्या कडेने शांतपणे चालावं. शाळेच्या आजूबाजूला मला नेहमी, “पळू नको.. ” अशी सूचना ऐकू येते. काही दिवसांपूर्वी, सहजच बागेत गेले होते. तिथे पाच-सहा वर्षांची  एक मुलगी जंगलजीम वर चढण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात …

मुलीचा बाबा

आपल्या नवऱ्याचं  जेव्हा बापमध्ये रूपांतर होतं, तेव्हा त्याच्यात खूप फरक पडतो. जर तो मुलीचा बाप झाला तर मग विचारायलाच नको. आपण ज्याला चांगलं ओळखतो, असं आपल्याला वाटत असतं त्याची वेगळीच प्रेमळ, हळवी बाजू दिसू लागते. मुलींसाठी बाबा म्हणजे काय हे सांगता येणं कठीण आहे. माझी मुलगी ३-४ वर्षांची असताना बाबासाठी पोळी करायची. अर्धीकच्ची पोळी बाबा …

आज्ञाधारक

Obedient Child=successful parent आणि disobedient child= failure असं एक समीकरण आपल्या सगळ्यांच्या मनात पक्कं असतं. मुलाला अधिकाधिक आज्ञाधारक बनविण्याचा प्रयत्न ह्या समीकरणातून होत असतो.  “माझा मुलगा किंवा मुलगी मी सांगेन ते सगळं ऐकतो/ऐकते”, ह्या गोष्टीचं आईबाबांना फार कौतुक असतं. जेंव्हा आई-बाबा मुलांना घेऊन येतात तेंव्हा बरेचदा, “ह्याला आमचं ऐकायला सांगा,” हा सूर असतो.  अपेक्षा अशी …

मठ्ठ

मठ्ठ

तो- एक मठ्ठ मुलगा..आणि त्याची आई मुलाला कसं शिकवावं हे न समजलेली आई…आणि त्याचं भविष्य म्हणजे फक्त अंधार… नुसताच मठ्ठ नाही तर बडबडाही… अर्धा दिवस वर्गाबाहेरच जायचा. गृहपाठ अपुरा, वह्या अपूर्ण.. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर यायचेच नाही… वर्गातही रोज उशिरा यायचा.. मास्तरांचा पारा चढायचा त्याला पाहून. दिवसाआड आईला नोटीस दिली जायची. ‘मुलाकडे लक्ष द्या’, म्हणून पालकत्वाचे …

importance of career counseling

करियर आणि व्यक्तिमत्व

करियर आणि व्यक्तिमत्व ह्यांचा खूप जवळचा संबंध असतो. व्यक्तिमत्त्व म्हणजे तुम्हाला इतरांपासून वेगळे करणारे तुमचे गुणधर्म. हे गुणधर्म प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात.व्यक्ती म्हणून तुमचं अस्तित्व आणि तुमचं महत्व ठरवत असतात.   व्यक्तिमत्वामध्ये  तुमचे गुण, अवगुण, स्वभाव-वैशिष्ट्ये, दिसणं, एखाद्या गोष्टीला सामोरे जाण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत, आचरण अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो. थोडक्यात, रंगीबेरंगी कागदाच्या तुकड्यांनी बनवलेलं …

Aptitude

Aptitude and Interest

मोठं झाल्यानंतर तुला कोण व्हायचंय?” हा प्रश्न जवळपास सगळ्याच लहान मुलांना विचारला जातो. आणि सुरुवातीला ‘आई किंवा बाबा’ हे उत्तर हळूहळू  डॉक्टर, इंजिनियर, सीए, आणि अशाच काही वेगवेगळ्या उत्तरात बदलत जाते. काय व्हायचं हे ठरवताना बरेचदा आई-बाबा किंवा घरातल्या मोठ्या माणसांचा सल्ला घेतला जातो. आई वडिलांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात नाव मिळविले असेल तर तेच कार्यक्षेत्र निवडले जाते. म्हणजे, आई-बाबा डॉक्टर असतील तर मुलंही डॉक्टर होतात, किंवा व्हावं  असं आई-बाबांना वाटत असतं. बिझिनेसमन …

what is career counseling

करियर कौन्सेलिंगची गरज

“मला ना खरंतर डॉक्टर व्हायचं नव्हतं,गाणं आवडायचं. गाणं शिकायचं होतं.” ती सांगत होती. “मग का नाही शिकलीस?” मी विचारलं. “कारण अभ्यासात हुशार होते ना..मग गाणं शिकून हुशारी वाया कशाला घालवायची?” अशी अनेक उदाहरणे असतात. लोक शिकतात, मोठे होतात अगदी यशस्वी होतात पण मनातून दु:खी असतात. कारण, जे करतात ते मुळात आवडतंच नसतं. १० वीनंतर साधारणपणे …