Showing 14 Result(s)

मुलांना अडचणी सोडवू द्या…

प्रसंग १ – “समजा शाळेसाठी आवरताना तुला उशीर होतोय. तर तू काय करशील?”परवा एका लहानग्याला हा प्रश्न विचारला. “मी काहीच करणार नाही. बाबा शाळेत सोडेल फास्ट गाडीवरून..” मला हसू आलं. मग जाणवलं. मागेही अनेकवेळेस मला सहा-सात वर्षांच्या मुलांकडून हेच उत्तर येतं. उशीर होत असेल तर पटपट आवरायचं हे त्यांच्यापर्यंत न पोहोचता, ‘बाबा किंवा आई सोडेल’, …

प्रयत्न करण्याची मानसिकता- ग्रोव्थ माइंडसेट

हल्ली आई-बाबांकडून एक  वाक्य नेहमी ऐकायला येतं, ‘तसा तो हुशार आहे,पण एखादी गोष्ट जमली नाही न कि  पटकन सोडून देतो. प्रयत्नच करत नाही.’ ह्या वागण्याचं मूळ कुठे येतं ? मानसिकता -mindset. विचार करण्याची ठराविक पद्धत. Carol Dweck ने ह्या विषयाचा अभ्यास केला. तिने दोन प्रकारचे mindsets सांगितले. Growth Mindset आणि फिक्स्ड mindset. फिक्स्ड mindset म्हणजे …

आई- सुरुवातीचं विश्व आणि विश्वासाची सुरुवात

‘जगावर आणि स्वत:वर असणारा विश्वास’ ही माणूस म्हणून घडण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट. अगदी तान्ह्या बाळालाही गरजेची असणारी. ‘जगावर आणि स्वत:वर असणारा विश्वास आकाराला येण्यासाठी  बाळाशी त्याच्या आईचं किंवा आईसारख्या कुणाचं तरी नातं फार महत्त्वाचं असतं. ‘प्रेम-विश्वास ‘ ह्या संकल्पनेची सुरुवात ह्याच नात्याने होते. बाळाच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्याबरोबरच बाळाला comfort देणं, त्याच्या रडण्याला response देणं, …

खेळता खेळता वाढे..

माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याचशा आई-बाबांना असं वाटतं, कि, मुलांनी शहाण्यासारखं वागावं. एका जागेवर स्वस्थ बसावं, उड्या मारू नयेत, पळापळी करू नये, शाळेतून निघाल्यानंतर रस्त्याच्या कडेने शांतपणे चालावं. शाळेच्या आजूबाजूला मला नेहमी, “पळू नको.. ” अशी सूचना ऐकू येते. काही दिवसांपूर्वी, सहजच बागेत गेले होते. तिथे पाच-सहा वर्षांची  एक मुलगी जंगलजीम वर चढण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात …