ADHD

“माझा मुलगा अजिबात एका जागेवर बसत नाही, सतत चुळबुळत असतो,त्याला ADHD तर नाही ना?” आई-वडील विचारतात.  ADHD हल्ली मुलांमध्ये दिसून येणारी एक कॉमन समस्या. बरेचदा, मुलाचे जास्त active असणं हे ADHD चं लक्षण समजलं जातं. जास्त active असणं हे ADHD च्या लक्षणांपैकी एक लक्षण आहे. पण फक्त जास्त active असणे म्हणजेच ADHD नव्हे. बरेचदा, आई-बाबांना असं वाटत असतं कि, माझ्या मुलाला/मुलीला  ADHD आहे म्हणजे तो/ती खूप हुशार आहे. IQ आणि ADHD ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे इथे लक्षात घ्यायला हवं.

जेंव्हा मुलांमध्ये ADHD असतो, तेंव्हा प्रामुख्याने तीन गोष्टी आढळून येतात, १) चंचलता( hyperactivity), २) impulsiveness- कुठे कसे वागायचे ह्याचे भान न राहणे. धोके लक्षात न येणे  ३) कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करता न येणे.

मग ही मुलं नेमकी कशी असतात, ADHD लक्षात कसा येतो?

ADHD लक्षात येण्यासाठी मुलाचे निरीक्षण करणे, मुलं,आई-वडील आणि शिक्षकांसोबत डिटेल interview ची आवश्यकता असते. काही टेस्ट्सचे अनालिसिस करून ADHD ची शक्यता वर्तवता येते.

ADHD असणाऱ्या मुलांना शाळेत अडचणी जाणवू लागतात. छोट्या-छोट्या चुका (silly mistakes) होतात. म्हणजे eat लिहिताना t लिहायचे विसरणे, किंवा गणितातील हातचा विसरणे, चिन्ह विसरणे. त्याबरोबर अजून एक गोष्ट जाणवते ती म्हणजे गोष्टी organaize करणे, planning करणे अवघड जाते. रोजच्या वापरातल्या pencils, खोडरबर, पेन ह्या गोष्टी हमखास हरवतात.

ही मुले वेळेत काम पूर्ण करणे कुठेही वेळेत पोहोचणे ह्या गोष्टी करताना झगडत असतात. कोणतेही काम सांगितल्यानंतर ते सुरु करणे आणि पूर्ण करणे ह्यागोष्टी त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. बरेचदा, एकाच वेळी अनेक कामे सुरु करून कोणतेच काम पूर्ण केले जात नाही. वह्या अपूर्ण असतात. वेळेचे गणित चुकते.

बरेचदा, तुम्ही त्यांच्याशी बोलताना तुम्हाला असे वाटेल कि ती ऐकतच नाहीयेत. ज्या गोष्टी करताना मनाची एकाग्रता लागते त्या गोष्टी हि मुलं टाळताना दिसतात. कारण लक्ष केंद्रित करताना त्यांना त्रास होत असतो.

वाट पाहणे, रागावर, भावनांवर नियंत्रण ठेवणे ह्या गोष्टी त्यांना जमत नाहीत. त्यामुळे इतर मुलांसोबत खेळताना त्यांना अडथळे येतात. मग हि मुलं पटकन भांडणावर उतरतात. तसेच पटकन रडायलाही लागतात. खूप जास्त excite होतात. खेळताना आपण कुठेतरी थांबायला हवं हे त्यांच्या लक्षातच येत नाही. आणि मग प्रमाणाबाहेर थकतात.

हि झाली ADHD ची लक्षणे. सगळ्यांमध्ये हि सगळी लक्षणे दिसतीलच असे नाही. काही वेळेस मुलं फक्त hyperactive दिसतील तर काहीवेळेस त्यांना फक्त लक्ष केंद्रित करतना अडथळे जाणवतील. काहीवेळेस दोन्हीही दिसून येईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हि मुले मतीमंद, स्लो लर्नर नसतात. काहीवेळेस त्यांच्यावर हा शिक्काही मारला जातो.

बरेचदा आपल्याला घाई झालेली असते. मुलामध्ये हि लक्षणे दिसतायत म्हणून आपणच त्याला ADHD आहे असे ठरवून मोकळे होतो. पण इथे थोडंसं थांबायला हवं. कारण, बरेचदा, ADHD ची लक्षणे आणि  बायपोलर डीसऑर्डरची लक्षणे तसेच ADHD आणि  ऑटीझमची लक्षणे ह्यांत गोंधळ होऊ शकतो. तसेच कित्येकदा, जीनियस असणारी मुलं त्यांच्या वेगामुळे,जास्त एनर्जीमुळे hyperactive वाटू शकतात. काहीवेळेस ADHD आणि गिफ्टेडनेस ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित असू शकतात. आपण मात्र ADHDचा शिक्का मारून मुलातल्या हुशारीकडे तसेच इतर आजारांकडे दुर्लक्ष करू शकतो. ह्यांत मुलाचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. हे ओळखण्यासाठी वेळीच तज्ञांचा सल्ला घेणं,मुलाचं निरीक्षण करणं आवश्यक आहे.

ADHD असो किंवा नसो मुलाच्या समस्येवर मार्ग शोधता येतो. आपण फक्त सजग असायला हवं.

About Vasudha Deshpande-Korde

Vasudha Deshpande-Korde, Clinical Psychologist and counselor.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *