‘जगावर आणि स्वत:वर असणारा विश्वास’ ही माणूस म्हणून घडण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट. अगदी तान्ह्या बाळालाही गरजेची असणारी.
‘जगावर आणि स्वत:वर असणारा विश्वास आकाराला येण्यासाठी बाळाशी त्याच्या आईचं किंवा आईसारख्या कुणाचं तरी नातं फार महत्त्वाचं असतं. ‘प्रेम-विश्वास ‘ ह्या संकल्पनेची सुरुवात ह्याच नात्याने होते. बाळाच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्याबरोबरच बाळाला comfort देणं, त्याच्या रडण्याला response देणं, त्याला मायेने जवळ घेणं आणि त्याला कळत नसलं तरीही, ‘भूक लागली शोनाला…आत्ता येते हं पिल्लू’ असं काहीतरी बोलणं विश्वास संपादन करण्यासाठी खूप आवश्यक असतं. हे सगळं सातत्याने पुरवणंही गरजेचं असतं.
सुरुवातीचे सहा आठवडे बाळाला काहीच कळत नाही. पण त्याकाळात आजूबाजूच्या परिसराची ओळख मात्र होत असते. आपल्या प्रत्येक हाकेला कुणीतरी ‘ओ’ देतंय हे ह्या काळात बाळाला कळते. अर्थात, हीच आपली आई हे कळायला थोडा अवकाश असतो. साधारण तिसऱ्या महिन्यापासून ‘हीच ती बाई हं, जी मला मायेने जवळ घेते हे बाळाला कळू लागतं.’ मग हुं..हुं करणे, हसणे ह्या गोष्टींना सुरुवात होते. अर्थात ह्याकाळात आईऐवजी कुणीही घेतलं तरी फारसा फरक पडत नाही. गप्पा मारण्याला आईनेही response दिला कि मग एक छान bond तयार होतो, आईमध्ये आणि बाळामध्ये.
तो हळूहळू इतका strong होतो कि, सातव्या महिन्याच्या आसपास ‘आई’ हे जणू सर्वस्व असतं. कुणीही घेतलेलं असलं तरीही आईजवळ जायचं असतं. सेपरेशन anxiety येते. ह्या वयातली अशी सेपरेशन anxiety हे एका निकोप नात्याचं लक्षण आहे.
जेंव्हा लहानपणी आईशी आणि आजूबाजूच्या लोकांशी निकोप नातं तयार झालेलं असतं, तेंव्हा ती व्यक्ती आनंदी आणि समाधानी असण्याचे चान्सेस वाढतात. जर आईकडून येणारा response सातत्याने येणारा नसेल किंवा आईला(काळजी घेणाऱ्या बाईला) वेळच नसेल, काही कारणाने मुलाकडे सतत दुर्लक्ष होत असेल तर त्याचे खूप दूरगामी परिणाम होतात. अशी मुलं मोठेपणीही नातेसंबंध स्वीकारताना, निभावताना कमी पडतात.
I am sure this post has touched all the internet users, its really really good post
on building up new weblog.